रायगडात 55 हजार मतदार पहिल्यांदाच बजावणार मतदानाचा हक्क

रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर 55 हजार 893 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे हे मतदार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांमध्ये 31 हजार 656 पुरुष, 24 हजार 233 महिला तर चार तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रशासनाने मतदार पुनरिक्षण कार्यक्रम राबविला होता. त्यानुसार रायगड जिल्ह्यात 24 लाख 88 हजार 788 मतदार असून, यामध्ये 12 लाख 59 हजार 567 पुरुष, 12 लाख 29 हजार 130 महिला, 91 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदार पुनरिक्षण कार्यक्रमात एकूण मतदारांपैकी 55 हजार 893 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.