आचारसंहितेत आतापर्यंत 304 कोटींचा ऐवज जप्त

विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत 3128 ठिकाणी आचारसंहिता भंग झाल्याचे प्रकार घडले. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारींची नोंद झाली आहे. आतापर्यंत निवडणूक आयोगाने 304 कोटी 94 लाख रुपयांचा बेकायदा ऐवज जप्त केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. बहुतांश तक्रारी सी-व्हिजिल या मोबाईल अॅपवर मिळाल्या आहेत. निवडणुकीसाठी पैसे, मद्य, अमली पदार्थ आणि सोने-चांदीसारखे मौल्यवान धातू यांचे वितरण होत असते, परंतु राज्य आणि पेंद्र शासनाच्या विविध यंत्रणा अशा बेकायदा हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याने आतापर्यंत 304 कोटी 94 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.