कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिष्णोई यांचे फोटो असलेल्या टी-शर्टची ई-कॉमर्स साईटवरून सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशाप्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण करणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दाऊद आणि लॉरेन्स बिष्णोई यांचे फोटो असलेले टी-शर्ट फ्लिपकार्टसह अलिएक्सप्रेस, टीशॉपर आणि इट्से यासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर पोलिसांना मिळाली. गुन्हेगारी व्यक्तिमत्त्वाला प्रोत्साहन देणारी अशी उत्पादने समाजासाठी हानीकारक असल्याने सायबर पोलिसांनी तत्काळ असे टी-शर्ट विकणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मविरोधात गुन्हा नोंदवला. चित्रपट निर्माते आलिशान जाफरी यांनीदेखील या घटनेचा सोशल मीडियावरून निषेध केला. गुंडांचे फोटो असलेल्या टी-शर्टची विक्री झाल्यास तरुण पिढीमध्ये चुकीचा आदर्श निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
किंग खानला 50 लाखांच्या खंडणीसाठी धमकीचा फोन
बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानला 50 लाखांच्या खंडणीसाठी धमकीचा पह्न आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. सेलिब्रेटींना धमक्यांचे पह्न येण्याची ही या महिन्यातील सहावी घटना आहे. धमकीच्या पह्ननंतर शाहरुखच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. मिंधे सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचे पार तीनतेरा झाले आहेत. पूर्वी गँगस्टर हे बॉलीवूडच्या मंडळींना पह्न करून खंडणीसाठी धमकावत असायचे. खंडणीसाठी धमकावण्याचे प्रकार पुन्हा मिंधे सरकारच्या काळात सुरू झाले आहेत. या महिन्यात बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला चार वेळा, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनादेखील धमकी आली होती.