ऐन विधानसभा निवडणुकीत मिंधे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाचे फोटो आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केले आहेत.
‘एक्स’ वर पोस्ट करताना आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ”आज सकाळी, मिंधे गटातून महाराष्ट्राची लूट पाहू न शकणाऱ्या, महाराष्ट्रप्रेमी पदाधिकाऱ्यांना पुन्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात घेतले.”
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित आज मिंधे गटाच्या महिला उपविभागप्रमुख रेणुका तांबे, वरळी विधानसभा समन्वयिका विजया महाजन, शाखा क्र. 196 चे शाखाप्रमुख श्रीकांत जावळे, शाखा क्र. 198 चे शाखाप्रमुख संतोष शिंदे, शाखा क्र. 199 चे शाखाप्रमुख ज्ञानदेव सणस, रळी विधानसभा अध्यक्ष (अल्पसंख्यांक विभाग) अन्वर खान दुराणी, शाखा 196 चे युवा शाखासमन्वयक अथर्व, शाखा 195 च्या समन्वयिका मोहिनी मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभाग 199 च्या माजी वॉर्ड अध्यक्ष शिला सिंग आणि शाखा 195 च्या उपशाखाप्रमुख रेश्मा धोत्रे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
आज सकाळी, मिंधे गटातून महाराष्ट्राची लूट पाहू न शकणाऱ्या, महाराष्ट्रप्रेमी पदाधिकाऱ्यांना पुन्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात घेतले.
१. महिला उपविभागप्रमुख रेणुका तांबे जी,
२. वरळी विधानसभा समन्वयिका विजया महाजन जी,
३. शाखा क्र. १९६ चे शाखाप्रमुख श्रीकांत जावळे… pic.twitter.com/xhjEHGr7gX
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 7, 2024