राज्यात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण : उत्तमकुमार रेड्डी

राज्यात महाविकास आघाडीसाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांचीदेखील राज्यात परिवर्तन करण्याची मानसिकता असल्यामुळे महाविकास आघाडीला राज्यात किमान दोनशे जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करून जालना विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांना आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळेल, अशी ग्वाही तेलंगणाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे मराठवाडा निरीक्षक उत्तमकुमार रेड्डी यांनी यावेळी बोलताना दिली.

जालना विधानसभा मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडीचे अधिकत उमेदवार आमदार कैलास गोरंट्याल यांच्या शहरातील मामा चौकातील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रेड्डी यांच्या हस्ते आज बुधवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. कल्याण काळे हे होते. शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जगदीश्वर राव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, रा.काँ. चे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, इक्बाल पाशा, राजेंद्र राख, शेख युसूफ, अकबर खान, रिपाइंचे किशोर मघाडे, आपचे संजोग हिवाळे, बदर चाऊस, विनय कोठारी, नंदा पवार, अब्दुल रऊफ परसुवाले, प्रभाकर पवार, गणेश राऊत, नंदकिशोर जांगडे, विजय चौधरी, दिनकर घेवंदे, अब्दुल रफिक आदींची यावेळी उपस्थिती होती.