शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कन्नड – सोयगाव व वैजापूर – गंगापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार उदयसिंग राजपूत व दिनेश परदेशी यांच्या प्रचारार्थ गुरुवार, 7 नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार आहेत. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, माजी आमदार किशोर पाटील, नामदेवराव पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दुपारी 4 वाजता कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील पिशोर येथे, तर सायंकाळी 6 वाजता वैजापूर – गंगापूर विधानसभा मतदारसंघातील शिऊर येथे जाहीर सभा होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महिला आघाडी, युवासेना, सर्व अंगीकृत संघटना, पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अवचित नाना वळवळे, अविनाश गलांडे, तालुकाप्रमुख संजय मोटे, सचिन वाणी, सुभाष कानडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष मंजाहारी गाढे, गणेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळ, प्रसन्न पाटील पवार, महिला आघाडी जिल्हा संघटक लता पगारे, उपजिल्हा संघटक हर्षली मुट्ठे, तालुका संघटक रुपाली मोहिते, वर्षा जाधव, जिल्हा युवा अधिकारी उमेश मोकासे व विठ्ठल डमाळे यांनी केले आहे.