दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीने मुंबईत कमालीचे प्रदूषण झाले. त्या प्रदूषणामुळे खालावलेली मुंबईच्या हवेची गुणवत्ता अद्याप सुधारलेली नाही. यातच शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सांताक्रुझमध्ये कमाल तापमानाचा पारा 37 अंशांवर गेला होता. तापमानात सरासरीपेक्षा दोन अंशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईकर प्रचंड घामाघूम झाले. शहर व उपनगरात आणखी चार दिवस कमाल तापमान 35 अंशांच्या पुढे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.