राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळातील कार्याने प्रभावित होऊन व राज्याचा विकास करण्याच्या दृष्टीने अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ, महाराष्ट्र राज्य यांनी एका पत्राद्वारे शिवसेना आणि महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.