अभिनेत्री आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत गोरखपूर मतदारसंघातून सपाच्या उमेदवार असलेल्या काजल निषाद यांची फसवणूक झाली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील फ्लॅटसाठी त्यांनी 2015 मध्ये बिल्डरला 70 लाख रुपये दिले होते. मात्र आता नऊ वर्षांनंतरही त्यांना ना फ्लॅट मिळाला ना पैसे परत मिळाले आहेत. दरम्यान याप्रकणासंबंधी त्यांनी गोरेगावच्या दिंडोशी पोलिसात दोन बिल्डर आणि एका बांधकाम कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तिन्ही आरोपींनी काजल निषाद यांच्यावरच आरोप करत न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.
अभिनेत्री काजल निषादने 2015 मध्ये फ्लॅट बुक केला होता. अशी माहिती काजलचे पती आणि चित्रपट निर्माता संजय निषाद यांनी दिली. त्यानंतर त्यांनी सिनर्जी कन्स्ट्रक्शन कंपनीला हप्त्याने पैसे दिले. या फ्लॅटसाठी सरिता मंत्री आणि शांती नारायण राठी यांच्याशी करार झाला होता. त्यावेळी आरोपींनी फ्लॅटचे मालकी हक्क सरिताचा पती सुनील मंत्री यांच्याकडे असल्याचा दावा केला होता. यानंतर आरोपीने फ्लॅटची नोंदणीही करून घेतली. मात्र खोलीचा ताबा घेण्यापूर्वी फ्लॅटच्या मालकी हक्कावरून वाद असल्याने न्यायालयाने नोटीस बजावली होती. ही नोटीस फ्लॅटबाहेर लावण्यात आली होती. त्यामुळे अभिनेत्रीला फ्लॅटचा ताबा मिळू शकला नाही.
काजल निषाद यांनी आरोपींकडे त्याचे पैसे परत मागितले. सुरूवातीला आरोपींनी हलगर्जीपणा केला आणि नंतर 2021 मध्ये पुन्हा एक करार झाला. यादरम्यान फ्लॅटचे बाजारमूल्य 85 लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यामुळे काजल यांनी आधी 46.5 लाख रुपये भरले आणि त्यानंतर 15 लाख रुपये देण्यात आले. याच दरम्यान 2022 च्या विधानसभा निवडणुका असल्यामुळे समाजवादी पक्षाने त्यांच्या पत्नी काजल निषाद यांना कॅम्पियरगंजमधून तिकीट दिले होते. यानंतर सपाने त्यांना गोरखपूर लोकसभा मतदारसंघातूनही तिकीट दिले.
निवडणुकी काळ संपल्यानंतर ते मुंबईत परतले आणि त्यांनी त्यांच्या फ्लॅटची पहाणी केली. यावेळी त्यांनी चौकशीासाठी त्यांनी बिल्डरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. फोन करूनही कोणतेही उत्तर न आल्याने त्यांनी आरोपीविरुद्ध दिंडोशी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.