डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले; शेअर बाजाराने दाखवली तेजी, टेक्नोलॉजीच्या स्टॉकची भरारी

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा परिणाम हिंदुस्थानच्या शेअर बाजारावरही झाला आहे. ट्रम्प यांच्या विजयाला बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने बाजारात तुफान तेजी दिसून आली. या तेजीमध्ये टेक्नोलॉजीच्या शेअरने जबरदस्त भरारी घेतली आहे. तसेच निफ्टी, बँक निफ्टीतही तेजी दिसून आली. TCS, इन्फोसिस, HCL Tech, Wipro आणि Dixon Tech या शेअरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

बुधवारी बाजाराची सुरुवात तेजीने झाली. मात्र, बाजारात गती दिसत नव्हती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे कल जाहीर होऊ लागले आणि ट्रम्प आघाडीवर असल्याचे दिसताच बाजाराने तेजीच्या दिशेने गती पकडण्यास सुरुवात केली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची घोषणा होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 800 अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 270 अंकांनी वधारला. तसेच जागतिक शेअर बाजारातही तेजी दिसून येत आहे.

या तेजीचा सर्वाधिक फायदा टेक्नोलॉजीच्या शेअरला झाला असून TCS, इन्फोसिस, HCL Tech, Wipro आणि Dixon Tech या शेअरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच BEL , AADANIENT , TECHM या कंपनीचे शेअरही वधारले होते. ट्रम्प यांच्या विजयाला गुंवणूकदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता गुंतवणूकदारांच्या नजरा फेडरल बँकेच्या अहवालाकडे या अहवालही सकारात्मक असल्यास बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.