अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. विजय दृष्टीपथास येताच फ्लोरिडातील एका मोठ्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वात श्रीमंत आणि आपल्या कट्टर समर्थकांपैकी एक असलेले एलॉन मस्क कौतुक केले. एक तारा जन्माला आलाय, असे कौतुक ट्रम्प यांनी मस्कचे करताच समर्थकांनी एकच जल्लोष केला.
आज एका ताऱ्याचा जन्म झाला आहे. हा एक असा राजकीय विजय आहे जो अमेरिकेने यापूर्वी कधीही पाहिला नसेल. मी प्रत्येक दिवस आणि अखेरच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढेल. आपली मुले ज्यासाठी पात्र आहेत त्यासाठी सुरक्षित, बळकट आणि सक्षम अमेरिका उभारत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आता आपण कोणतेही युद्ध होऊ देणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प म्हाणाले.
ट्रम्प यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी एलॉन मस्कही मैदानात उतरले होते. 53 वर्षांचे अब्जाधीश असलेले एलान मस्क यांनी X म्हणजेट ट्विटरवरून मोठी प्रचार मोहीम उघडली होती. ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी सुमारे 120 दशलक्ष डॉलर खर्च केले. ट्रम्प यांनी अनेकदा हे जाहीरपणे कबूल केले आहे.
तो (एलॉन मस्क) एक आश्चर्यकारक माणूस आहे… आम्ही फिलाडेल्फिया आणि पेनसिल्व्हेनियाच्या वेगवेगळ्या भागात प्रचारासाठी दोन आठवडे सोबत होतो, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या स्टारशिप स्पेसएअरक्राफ्टच्या पाचव्या चाचणीबद्दलही ट्रम्प बोलले. प्रज्वलीत झालेले रॉकेट खाली येताना बघितले आणि हे फक्त एलॉनच करू शकतो. मी एखादी स्पेस मुव्ही किंवा वेगळचं काहीतरी बघतोय, असे मला त्यावेळी वाटले. रॉकेट वेगाने झेपावलं. मात्र, ते अतिशय हळूवारपणे खाली आलं आणि एका लहान बाळासारखं त्याने हात आपल्या भोवती गुंडाळले आणि धरले. त्यामुळेच मला एलॉन मस्क आवडतो. अमेरिकेला असे बुद्धिमान फार कमी आहेत आणि अमेरिकेला त्यांची गरज आहे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.