प्रा. वामन केंद्रे यांची ‘अभिनयाची जादू’ कार्यशाळा

प्रसिद्ध नाटय़ दिग्दर्शक, प्रशिक्षक आणि एन.एस.डी.चे माजी संचालक प्रा. वामन केंद्रे यांची ‘अभिनयाची जादू’ म्हणजे ‘मॅजिक ऑफ ऑक्टिंग’ या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. रंगपीठ थिएटर आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट- मुंबईच्या वतीने तीन दिवसांची कार्यशाळा येत्या 8, 9 व 10 नोहेंबर रोजी राजर्षी शाहू सभागृह, दादर येथे होईल.

कार्यशाळेत अभिनयाची जादू काय असते, या क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी काय करावे लागते, तसेच अभिनयाचे प्रकार, अभिनयाच्या शैली, भूमिकेचा अभ्यास, संभाषण म्हणजे काय? त्याचे मूळ व्याकरण, प्रभावी संभाषणाची तत्त्वे कोणती, याविषयीच्या प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे. नाटक, चित्रपट, दूरदर्शन, जाहिरात, वेब सीरिज,  रेडिओ, व्हाईस ओव्हर आदी माध्यमांमध्ये करीअर करण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केले जाईल. कार्यशाळा निःशुल्क असून अधिक माहितीसाठी संपर्क 7039475537/ 9820868628 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदवावे, असे आवाहन रंगपीठ थिएटर मुंबईच्या गौरी पेंद्रे व श्री छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी केले आहे.