निष्ठेचे पाईक…वैभव नाईक…! कुडाळ – मालवणात वैभव नाईक यांचा हायटेक प्रचार जोरात

निष्ठेचे पाईक… वैभव नाईक! अशी टॅगलाईन घेऊन कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांचा हायटेक प्रचार कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. सोशल मीडियावरील प्रचारात वैभव नाईक यांनी आघाडी घेतली आहे. रिल्स, पोस्टरच्या माध्यमातून प्रचाराचा धुमधडाका जोरात सुरू आहे.

आमदार वैभव नाईक यांची ही चौथी निवडणुक आहे. दोन वेळा विजयी होत सलग दहा वर्षे त्यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले. आता तिस-यांदा आमदार होण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी त्यांनी कुडाळ शहरात रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत त्यांचे फोटो असलेले फलक झळकवले. प्रचार रथही रॅलीत सहभागी करण्यात आला होता. निष्ठेचे पाईक…वैभव नाईक अशी टॅगलाईन घेऊन कार्यकर्ते आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारात जोरदारपणे उतरले आहेत. आपला माणूस, वैभव नाईक… सर्वसामान्यांचा आमदार वैभव नाईक… अशीही टॅगलाईन प्रचारात वापरली जात आहे.

अडीच वर्षापूर्वी झालेल्या शिवसेना पक्ष फुटीनंतर आमदार वैभव नाईक हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहीले. म्हणूनच त्यांना निष्ठावंत आमदार म्हणून जनतेकडून बिरुदावली मिळाली. हिच थीम विधानसभा निवडणुकीत प्रचारात वापरली जात आहेत. आमदार वैभव नाईक यांनी हायटेक प्रचारात आघाडी घेत, धगधगती मशाल घराघरात पोहचविण्यावर भर दिला जात आहे. सर्वांशी आपुलकीचे नाते जपणारा, जिवाभावाचा माणूस वैभव नाईक, हक्काचा आमदार वैभव नाईक, समृद्ध सिंधुदुर्गसाठी वैभव नाईक हवे अशी पोस्टर्स, रिल्स सध्या सोशल मीडियावर प्रचारात फिरत आहेत.

आमदार नाईक यांनी केलेली विकास कामे, जनतेच्या प्रश्नांबाबत केलेली लोकहितासाठीची आंदोलने, सोडविलेले प्रश्न, विविध कार्यक्रमातील सहभाग, सर्वसामान्य जनतेशी आपुलकीने साधत असलेला जनसंवाद, आदी रिल्सच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवले जात आहे. व्हाट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियावर युवावर्गाचा मोठा बोलबाला असतो. हेच सोशल मीडिया सध्या प्रचारासाठी प्रभावी माध्यम बनले आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. अत्याधुनिक प्रचार रथही सज्ज ठेवण्यात आला आहे. गावागावात जाताना आमदार नाईक बडेजाव न करता, अगदी साधेपणाने वावरताना दिसतात. आताही प्रचारासाठी जाताना अबालवृद्धांसह युवावर्गाशी अगदी दिलखुलासपणे संवाद साधताना दिसत आहेत. युवावर्गात त्यांनी वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे.