विक्रोळी विधानसभेतील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार सुनील राऊत यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज शिवसेना नेते – खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
विक्रोळीत शिवसेनेची मशालच धगधगणार आणि सुनील राऊत यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी करणार, असा निर्धारच यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी शिवसेना उपनेते दत्ता दळवी, दादा पिसाळ, माजी नगरसेवक तावजी गोरुले, काँग्रेसचे राहुल वाघधरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका मनीषा रहाटे, माजी नगरसेवक चंदन शर्मा, माजी नगरसेवक चंद्रकांत निर्भवणे, म्युन्सिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, युवासेना कार्यकरणी सदस्य राजोल संजय पाटील उपस्थित होते. त्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.