निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळमधील पोटनिवडणुकांच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशच्या 9 विधानसभा जागांसह इतर राज्यांतील 14 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या तारखेत बदल केला आहे. या जागांसाठी 13 नोव्हेंबरला मतदान होणार होते. मात्र आता येथे 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
उत्तर प्रदेशात भाजप, आरएलडी आणि बसपने निवडणुकांच्या तारखा बदलण्याची मागणी केली होती. कार्तिक पौर्णिमेच्या आधी जत्रेचे आयोजन केले जाते आणि लोक मोठय़ा संख्येने गंगेत स्नान करतात. कार्तिक पौर्णिमा आणि गुरुनानक देवजींचे प्रकाश पर्व 15 नोव्हेंबर रोजी साजरे केले जाते. हे कारण देत पंजाबमध्येही अशीच मागणी करण्यात आली होती.