राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. आता दापोली विधानसभा मतदारसंघात 9 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तरीही प्रमुख लढत ही मिंधे गट आणि शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांमध्येच होणार आहे. योगेश रामदास कदम या नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारामुळे मिंधे गटासमोरील अडचण वाढली आहे. तसेच या भआगात शिवसेनाला जनतेचा पाठिंबा दिसत असल्याने मिंधे गट बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजय कदम यांची बाजू भक्कम दिसत आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी दापोली मतदारसंघातून एकुण 10 उमेदवारांनी 14 नामनिर्देशिन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले होते. निवडणुकीसाठी नामनिर्देशिन सादर केलेल्या उमेदवारांपैकी नामनिर्देशिन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एका उमेदवाराने आपले नामनिर्देशिन पत्र मागे घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 9 उमेदवार आहेत.
निवडणुकीत रिंगणात आता अबगुल संतोष सोनू ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना) , कदम योगेश रामदास ( शिंदे गट) , कदम संजय वसंत शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे), मर्चंडे प्रविण सहदेव ( बहुजन समाज पार्टी) हे चौघे राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत तर कदम योगेश रामदास, कदम योगेश विठ्ठल, कदम संजय सिताराम ,कदम संजय संभाजी,खांबे ज्ञानदेव रामचंद्र हे पाचजण अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात आहेत.