ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. पद्मश्रीने सन्मानित झालेल्या देबरॉय यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक समितीचे अध्यक्ष या नात्यानेही महत्त्वाची भूमिका निभावली होती. 1955 साली जन्मलेल्या देबरॉय यांनी कोलकाता शहरातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले.
देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिमत्त्व -नरेंद्र मोदी
देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिमत्व असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांचा गौरव केला. देशाच्या ज्ञानकेंद्रित परंपरेत त्यांचे मोलाचे योगदान राहील, असे त्यांनी म्हटले आहे.