गिरगाव ठाकूरद्वार विभागातील करेलवाडी येथील तीन मजली ‘ओशमीक हाऊस’ या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता भीषण आग लागली. आगीत 40 जण अडकले होते. लाकडी बांधकामामुळे आग वेगाने भडकली. संपूर्ण चाळीत धूर पसरल्याने रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून खाली उडय़ा घेतल्या. त्यात तिघे जण जखमी झाले. जवळच सुरू असलेल्या मेट्रोच्या कामगारांनी आगीत अडकलेल्यांची शिडय़ांच्या सहाय्याने सुटका केली.