महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीआधी सर्व यंत्रणा राज्यात होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. निवडणुका लक्षात घेता संपूर्ण राज्यात एसएसटी (स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम) ला नियुक्त करण्यात आले आहे. गुरुवारी मुंबई एसएसटीने 10.8 कोटींच्या विदेशी चलन जप्त केले आहेत. तपास पथकाने मुंबई मरीन ड्राईव्ह येथे एका संशयित कारला पकडले आणि तपासणी केली. त्यावेळी तपासात मोठ्या प्रमाणात विदेशी चलन सापडले आहे. या घटनेची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कारमधून जप्त करण्यात आलेल्या चलनात यूएस आणि सिंगापूर डॉलरसह अनेक देशांच्या चलनांचा समावेश आहे. चलनासह पकडलेल्या व्यक्तीने बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेची कागदपत्रे सादर केली असून, विमानतळावरून हे चलन मिळाले असून ते बँकेत नेत असल्याचा दावा केला आहे. कारमधून जप्त करण्यात आलेले चलन मोठ्या प्रमाणात असून ते पुढील तपासासाठी कस्टमकडे सोपवण्यात आले आहे.
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होत असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यात 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या, त्यानंतर महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली असून तपास यंत्रणांचे राज्यात होणाऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष आहे.