रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला एकही मतदारसंघ न आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजपच्या वाट्याला गुहागर मतदारसंघ येईल या आशेवर भाजप कार्यकर्ते होते. मात्र मिंधे गटाने शेवटच्या यादीत गुहागर मतदारसंघ बळकावत भाजप कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर हे पाच मतदारसंघ आहेत. यापैकी चार मतदारसंघ मिंधे गटाने बळकावले आहेत. दापोली, रत्नागिरी आणि राजापूर या तीन मतदारसंघांत मिंधे गटाने आपले उमेदवार पहिल्या यादीत जाहीर केले होते. चिपळूण मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेला.