विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या चिन्हाचे तुतारी हे भाषांतर रद्द केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी तुतारी फुंकणारा व्यक्ती असे निवडणूक चिन्ह मिळाले होते. पण काही ठिकाणी ट्रम्पेट हे चिन्ही काही उमेदवारांनी देण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मतदारांचा काही ठिकाणी गोंधळ झाला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचे तुतारी हे मराठी भाषांतर रद्दे केले आहे. ज्या उमेवदावारेच चिन्ह ट्रम्पेट असेल तर तिथे देवनागरीत ट्रम्पेट असेच लिहिलेले असेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारापुढे तुतारी वाजवणारा माणूस असे लिहिलेले असेल. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे.