उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात, गरोदर महिलेसह पाच जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये दिवाळीच्या दिवशीच एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये गरोदर महिलेचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बदांयू जिल्ह्यात एकाच कुटुंबातील काही लोक दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावी जात होते. सर्व कुटुंबीय छोट्या टेम्पोमधून प्रवास करत होते. तेव्हा एका ट्रॅक्टर ट्रॉलीने त्यांच्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर एक कारने मागून या ट्रॉलीला मागून धडक दली आणि हा टेम्पो डिव्हायडरला जाऊन धडकला. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळाहून फरार झाला.

या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले होते. धक्कादायक म्हणजे या अपघातात एका गरोदर महिलेचा मृत्यूही झाला आहे. घटनास्थळावर परिस्थिती इतकी गंभीर होती की रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. तसेच मृतांचे शरीर गाडीत अडकले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच फरार आरोपीचा शोधही सुरू आहे.