आगामी IPL 2025 मध्ये धमाका करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे. मागील काही दिवसांपासून रिटेन आणि रिलिज करण्यात येईल अशा खेळाडूंची यादी सोशल मीडियावर प्रसारित होतं होती. मात्र, या सर्व गोष्टींना आता पूर्णविराम बसला असून मुंबई इंडियन्सने रिटेने केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला मुंबई इंडिन्सने आपल्या ताफ्यात कायम ठेवले आहे. मागील हंगामात कर्णधार म्हणून अपयशी ठरलेल्या हार्दिक पंड्याच्या खांद्यावर पुन्हा एकदा कर्णधार पदाची धुरा सोपवण्यातल आली आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा 2011 पासून मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएलसाठी आपल्या संघात कायम ठेवले आहे. रोहित व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा या पाच खेळाडूंना संघाने रिटेन केले आहे.