माढ्यातील सीना नदीत चार उसतोड कामगार बु़डाले, शोध सुरू

drowned

माढा येथील खैरावमधील सीना नदीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील चार ऊसतोड कामगार बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बेपत्ता ऊस कामगारांचे शोध कार्य पोलिसांनी सुरू केले आहे. शंकर विनोद शिवणकर (वय 25), प्रकाश धाबेकर (वय 26), अजय महादेव मंगाम (25), राजीव रामभाऊ गेडाम, (वय 26) अशी बुडालेल्या कामगारांची नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार खैराव येथे यवतमाळवरून हे ऊसतोड कामगार आले होते. नदी पात्रात आंघोळ व कपडे धुण्यासाठी गेले असता त्या पैकी शंकर हा पाण्यात गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी प्रकाश गेला असता तो ही बुडू लागला त्यांना वाचविण्यासाठी इतर दोघेही उतरले असता पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने चौघे ही पाण्यात बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले मात्र अद्याप शोध लागला नाही