सोलापूर जिह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांत 335 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, 49 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. सर्वाधिक उमेदवार दक्षिण सोलापूर, शहर मध्य, पंढरपूर व सांगोल्यात आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस 4 नोव्हेंबर असून, त्याच दिवशी प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सोलापूर जिह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांसाठी 384 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यांतील 49 उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून, 335 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यांतील सर्वाधिक उमेदवार दक्षिण सोलापूमध्ये आहेत. अर्ज बाद होणाऱया उमेदवारांची संख्याही याच मतदारसंघात आहेत.
मतदारसंघनिहाय वैध व अवैध उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे ः
करमाळा 31-4, बार्शी 31-6, मोहोळ 27-2, शहर उत्तर 26-6, शहर मध्य 39-5, अक्कलकोट 15-3, दक्षिण सोलापूर 40-11, पंढरपूर 38-2, सांगोला 32-5, माळशिरस 25-4.
शहर उत्तर विधानसभा व दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या अर्ज छाननीदरम्यान किरकोळ वाद झाले; परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज मंजुरीनंतर वातावरण निवळले.