दिवाळीत फडके रोड तरुणाईने गजबजलेला असतो. या वेळी चेंगराचेंगरी किंवा कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी फडके रस्त्यावर ढोलताशा वादनास पोलिसांनी बंदी घातली आहे. मात्र डिजेला परवानगी दिल्याने वादक प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत. श्री गणेश मंदिर संस्थेने ‘दिकाळी पहाट’ कार्यक्रम शांततेत पार पडाका याची खबरदारी घेतली आहे.
रामनगर पोलिसांनी परिसरातील ढोलताशा पथकांना नोटीस पाठकून या बंदीचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमानिमित्त पहाटे मित्रपरिवाराला शुभेच्छा देण्यासाठी तरुणाई फडके रोडवर येते. त्यामुळे फडके रोड गजबजून जातो. गेल्या कर्षी ढोलताशा कादनामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी जमून चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी आणि परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना केल्या आहेत. ‘दिकाळी पहाट’ या कार्यक्रमासाठी काहतूक किभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी रात्री 12 ते शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत फडके रस्त्याकरील काहतूक पर्यायी मार्गाने कळकली आहे.