बॉलीवूडचा दबंग सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली सध्या प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून बिश्नोई टोळीकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी येत आहे. या धमक्यानंतर सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सोशल मीडियावर पोस्ट करत लॉरेन्स बिश्नोई सोबत बोलण्याची ईच्छा व्यक्त केली. आता पुन्हा एकदा एका मुलाखतीत तिने पुन्हा एकदा सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईवर टीपणी केली आहे.
सोमी अलीने अलीकडेच IANS या संस्थेला मुलाखत दिली. यावेळी सोमीने सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईसोबतच्या तिच्या नात्याबद्दल आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी तिला सलमान जसा त्याच्या इतर X मैत्रिणींसोबत संबंध ठेवतो, त्यांच्य़ाशी बोलतो तस तुझ्यासोबत का बोलत नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी “सलमान माझ्याशी जसं वागला, तसं इतर कोणाशीही वागलेला नाही. संगीता आणि कतरिनाला सलमानने जेवढं छळलं नाही तितका जास्त त्रास त्याने मला दिला आहे. असे ती यावेळी म्हणाली.
सोमीने मुलाखतीदरम्यान सलमान आणि लॉरेन्सची तुलनाही केली आहे. सलमान जसं माझ्यासोबत वागला आहे त्यापेक्षा लॉरेन्स अनेकपटीने बरा आहे. सलमानने मला एकदा मारहाण देखील केली होती. मला खूप पाठदुखी होत होती आणि बराच वेळ बेडवर पडून होते. माझी अवस्था पाहून तब्बू खूप रडली होती. पण माझी अशी परिस्थिती असताना देखील सलमान मला भेटायला आला नाही. असे यावेळी सोमीने सांगितले. मी लवकरच सलमानसोबतच्या माझ्या नात्याबद्दल एक पुस्तक लिहित आहे. ज्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा खुसासा होईल असेदेखील सोमीने सांगितले.