जागतिक आरोग्य संघटनेने क्षयरोगाबाबत (टीबी) धक्कादायक आकडा समोर आला आहे. नव्या अहवालानुसार, 2023 मध्ये 80 लाख लोकांना टीबीचे संक्रमण झाले. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. अहवालामध्ये दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिका आणि पश्चिम पॅसिफिक प्रदेश जास्त प्रभावित आहेत.
अहवालानुसार, मागच्या वर्षी जवळपास 1.25 मिलीयन लोकांचा टीबीने मृत्यू झाला आहे. हा मृत्यू 2023 मध्ये एचआयव्हीने मृत्यू झालेल्या लोकांपेक्षा दुप्पट आहे. WHO ने सांगितले की, टीबीने सगळ्यात अधिक दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिका आणि पश्चिम पॅसिफिक प्रदेशातील लोकं प्रभावित झाली आहे. जगातील अर्ध्याहून अधिक प्रकरणे हिंदुस्थान, इंडोनेशिया, चीन , फिलीपिन्स आणि पाकिस्तानमध्ये आहेत.
WHO चे महानिदेशक टेड्रोस एडनोम घेबियस यांनी एका निवेदनात सांगितले, टीबी आजही अनेकांचा जीव घेतो आणि आजारी पडतो. आपल्याकडे याला रोखायला, याचा पत्ता लावायला आणि याच्यावर उपचाराची उपकरणे आहेत. जागतिक स्तरावर टीबी ने मृत्यूंचा आकडा कमी होत चालला आहे आणि नवे संक्रमण होणाऱ्या लोकांचा आकडा स्थिर होत चालला आहे.