Maharashtra election 2024 – पालघरनंतर माहीममध्ये गद्दार संकटात, सदा सरवणकरांवर टांगती तलवार

शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात गेलेल्या आणि सूरतमार्गे गुवाहाटीवारी करणाऱया श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापण्यात आले. भाजपच्या दबावाला बळी पडत मिंध्यांनी वनगा यांना बाजूला सारले. त्यापाठोपाठ माहीमधील गद्दार सदा सरवणकरही संकटात आले आहेत.

सरवणकर यांनी निवडणूक लढवू नये यासाठी भाजपचा प्रचंड दबाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मिंधे गटातील बहुतांश नेत्यांनीही त्यासाठी दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतरहा सरवणकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र, त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे.

वनगा 20 तासांपासून नॉट रिचेबल

मिंधेनी माझा घात केला, ते षडयंत्री आहेत असा आरोप करणारे आमदार श्रीनिवास वनगा गेल्या वीस तासांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ असून कुटुंबाशीही संपर्क झालेला नाही. त्यामुळे वनगांचे झाले तरी काय? अशी चर्चा पालघरमध्ये सुरू आहे. मिंधेंनी वनगांचे तिकीट कापून ते भाजपमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांना दिले आहे. त्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या वनगांनी दोन दिवसांपासून अन्नाचा कणही न घेता स्वतŠला काsंडून घेतले होते. त्यानंतर सोमवार रात्रीपासून वनगा घरातून निघून गेले आहेत. दरम्यान, त्यांनी पोलीस संरक्षणही परत केले आहे.