बावनकुळेंच्या ताफ्यातील गाडय़ांचा अपघात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील चार ते पाच गाडय़ा एकमेकांवर आदळल्याची घटना घडली. अंबिका बार सावनेर मार्गाजवळ झालेल्या या अपघातात भाजपचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना हितेश बनसोड यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.