लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना आज मोठा झटका मिळाला. संगमनेरची जागा मिंधे गटाकडे गेल्याने सुजय विखेंचा पत्ता कट झाला.
गेल्या काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजपचे सुजय विखे पाटील यांनी शड्डू ठोकला होता. मात्र ही जागा मिंधे गटाकडे गेल्याने तिथून अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली.
बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे यांच्यात सुरू असलेल्या सुंदोपसुंदीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखेंना धक्का बसला. काही दिवसांपूर्वी धांदरफळ येथे सुजय विखेंच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत सुजय विखे व्यासपीठावर असताना वसंत देशमुख याने जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर संगमनेरचे वातावरण चांगलेच तापले. पेंद्रीय गृह मंत्रालयानेही याची दखल घेतली होती. राजकीय वर्तुळातही मोठी टीका झाली. या सगळय़ा पार्श्वभूमीवर सुजय विखे यांना आज झटका मिळाला. नेवासामधून भाजपचे पदाधिकारी विठ्ठलराव लंघे यांना पक्षात घेऊन मिंधेंनी उमेदवारी दिली. मात्र तसा प्रयत्न विखे यांच्या बाबतीत झाला नाही. आता अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी सुजय विखे संगमनेरला जाणार की, वडिलांच्या प्रचाराला शिर्डीत थांबणार याकडे लक्ष लागले आहे. स्वपक्षाने विखे यांची काsंडी केल्याचे दिसून येतेय.