आंध्र प्रदेशात भरधाव कारची लॉरीला धडक, अपघातात इस्कॉनच्या सहा सदस्यांचा मृत्यू

आंध्र प्रदेशात धार्मिक कार्यक्रमाहून परतत असताना कार लॉरीला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात इस्कॉनच्या सहा सदस्यांचा मृत्यू झाला. ताडीपत्री येथे आयोजित इस्कॉन कार्यक्रमातून पीडित महिला अनंतपूरला परतत असताना नयनपल्ली क्रॉस रोडजवळ ही घटना घडली. अनंतपूर जिल्ह्याचे अतिरिक्त एसपी रामनमूर्ती यांनी अपघाताची पुष्टी केली.

प्रवासादरम्यान कारचा टायर फाटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार अनियंत्रित झाली. दरम्यान कार लॉरीला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. संतोष, शानमुख, वेंकन्ना, श्रीधर, प्रसन्ना आणि व्यंकट अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे अनंतपूर-कडप्पा राज्यमार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.