कोट्यधीश बनायचं…वापरा 21X10X12 फॉर्मूला…जाणून घ्या नेमके काय करायचं…

प्रत्येकजण आपल्या कमाईचा काही भाग आपल्या दैनंदिन खर्चातून बाजूला काढून अशा ठिकाणी गुंतवतो जिथे त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळतो. अनेकजण वृद्धापकाळासाठी बचत करतात, तर काही त्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी गुंतवणूक करतात. तुम्हीही निवृत्तीनंतर वद्धापकाळासठी आणि मुलांच्या खर्चासाठी मोठा निधी उभा करण्याचा विचार करत असाल तर 21X10X12 हा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. तुम्ही या फॉर्म्युला अंतर्गत गुंतवणूक केली तर तुमची मुलं 21 वर्षांची होईपर्यंत कोट्यधीश होतील.

कुटुंबातील सर्वजण मुलांच्या भवितव्याबद्दल चिंतेत असतात. त्यासाठी ते मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नापर्यंत सर्व गोष्टींसाठी मोठ्या निधिची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या काळात, तुमच्या मुलाला कोट्यधीश बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मुलांसाठी मोठा निधी जमा करण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड SIP किंवा इतर गुंतवणूक योजनेचा पर्याय निवडू शकता. दरमहा केवळ 10,000 रुपयांची बचत करून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभा केला जाऊ शकतो.

(SIP) ही एक दीर्घकालीन गुंतवणूक प्रक्रिया आहे. यामध्ये विशेष परताव्यासह, दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास  चक्रीवाढ व्याजाचा फायदा होतो. त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही एसआयपी सुरू केली तर तीअधिक फायदेशीर ठरू शकते. आपण एसआयपीमध्ये मिळालेल्या परताव्यावर नजर टाकली तर, अनेक एसआयपीचे परतावा दीर्घ काळाच्या मुदतीत 20 टक्क्यांपर्यंत आहे. सरासरी, परताव्याचा दर 12 ते 16 टक्क्यांपर्यंत असतो, जो चक्रव्याढ व्याजासह मोठा निधी जमा करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

जाणून घ्या 21X10X12 फॉर्मूला –

21X10X12 फॉर्म्युलानुसार 21 वर्षे गुतंवणूक करावी लागेलय 10 म्हणजे तुम्ही केलेली SIP दरमहा 10,000 असेल आणि 12 म्हणजे तुम्हाला 12 टक्के परतावा मिळाला तर तुमच्या मुलासाठी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी जमा होईल.

SIP कॅल्क्युलेटरच्या फॉर्म्युलाप्रमाणे मूल जन्माला येताच त्याच्या पालकांनी दरमहा 10,000 रुपये SIP करावी. ही SIP 21 वर्षांसाठी असेल. या कालावधीत तुम्ही गुंतवलेली एकूण रक्कम रु. 25,20,000 असेल. यावर तुम्हाला 20 टक्के नव्हे तर सरासरी 16 टक्के परतावा मिळाला तर परतावा रक्कम 1,81,19,345 रुपये असेल. यानुसार 21 वर्षांत तुमचा एकूण निधी 2,06,39,345 रुपये होईल.