Jammu-Kashmir : कुलगाममध्ये भारतीय लष्कराचे वाहन उलटले, एक सैनिक ठार; 9 जखमी

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ऑपरेशनल मूव्ह दरम्यान लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरल्याने उलटले. या अपघातात एका सैनिकाचा मृत्यू झाला, 9 जण जखमी झाले. जखमी सैनिकांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. जखमींची प्रकृती आता स्थिर आहे.

कुलगामच्या डीएच पोरा भागात शुक्रवारी रात्री ऑपरेशनल मूव्ह दरम्यान हा अपघात झाला. सर्व जखमी सैनिकांची प्रकृती स्थिर आहे, असे लष्कराच्या श्रीनगर-आधारित चिनार कॉर्प्सने एक्स अकाऊंटवर पोस्ट केले आहे.