मशाल हाती घेत गद्दारांना भस्म करण्यासाठी सज्ज व्हा; अंबादास दानवे यांचे आवाहन

आई भवानीची ‘मशाल’ निशाणी हाती घेत गद्दारांना भस्म करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघातील गंगापूर तालुक्यातील 53 गावांतील झोडेगाव येथे शिवसंवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिनेश परदेशी यांनी नेतृत्व केले. झोडेगाव येथे नागरिकांसोबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत पडल्याचे पाप या नालायक सरकारने केले आहे. या गद्दार आमदारांना येत्या निवडणुकीत गाडण्यासाठी सज्ज राहून शिवसेनेचे निष्कलंक चारित्र्य असलेले, सुशिक्षित उमेदवार दिनेश परदेशी यांनाच मतदान करण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिनेश परदेशी म्हणाले की, गद्दार आमदारांनी केवळ कागदावर खोटा विकास केला. मला जनतेचा सेवक व्हायचे आहे.प्रास्ताविक सुभाष कानडे यांनी केले. आज सकाळी महालगाव येथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या मोटारसायकल रॅलीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व उमेदवार दिनेश परदेशी दोघे एकाच मोटारसायकल वरून शिवसैनिकांच्या बरोबर सहभागी झाले. ही मोटारसायकल रॅली तरुणांनी स्वयंस्फूर्तीने काढून गद्दार आमदारांना येत्या निवडणुकीत आसमान दाखवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. या शिवसंवाद दौऱ्यामध्ये मेंढी, भालगाव, मालुंजा, शिरसगाव, शरिफपूरवाडी, बोलठाण, वडाळी या गावातील नागरिकांनी ढोलताशांच्या गजरात, फुलांची उधळण करीत स्वागत केले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, लक्ष्मण सांगळे, अंकुश सुंब, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता पगारे, तालुकाप्रमुख सचिन वाणी, सुभाष कानडे, मनोज गायके, बबन म्हस्के, विधानसभा संघटक मनाजी मिसाळ, उपतालुका रवींद्र पोळ, विश्वंभर शिंदे, अकील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कडुबा हिवाळे, गंगापूर साखर कारखान्याचे संचालक रामनाथ पाटील, वडाळीचे शाखाप्रमुख देवपुरी, भारत राजपूत भारत राजपूत, कैलास लोंढे, बद्रीनाथ लोंढे, शेकनाथ लोंढे, राजू लोंढे, गुलाब बेग, भिमराज पवार, विजय माळी, नुरा बेग, दादाभाऊ लोंढे, पोपटराव चव्हाण, रतन चव्हाण, विश्वजीत चव्हाण, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, वाल्मिक शिरसाठ, विठ्ठल डमाळे, पांडुरंग कापे, गुलाब शहा, विभागप्रमुख महेश लिंगायत, धोंडीराम अंबाडे, शाखाप्रमुख वाल्मिक नरोडे, भुषण राजपूत, तांदुळवाडीचे माजी सरपंच अजित राजपूत, दादा जगताप, युवा सेनेचे अमोल चव्हाण, श्रीकांत चव्हाण, अशोक पठारे, कल्याण शेजुळ, विजय बेडवाल, सचिन बेडवाल, सचिन चिंतामणी, तुकाराम शेजुळ, दलीत आघाडीचे भाऊसाहेब आमराव, सुरेश नरोडे, धनराज कहाटे, सारंगधर गायकवाड, गौतम गायकवाड, स्वरूप ताटू, देवचंद कहाटे, सूरज चव्हाण, सागर चव्हाण, अरुण राऊत, किरण गवळी, योगेश पाटेकर, गणेश लिंगायत, भाऊसाहेब नेमाने, प्रमोद कैलास लोंढे, अमरसिंग राजपूत, योगेश जैस्वाल, महाजन, रणधीर राजपूत, किसन कवाळ यांच्यासह, पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, युवक, महिला मोठ्या संख्येने या दौऱ्यात सहभागी झाले.