रोजगार गुजरातला, इकडे मिंधे गारेगार! आदित्य ठाकरे यांचा घणाघात, पाचोऱ्यात वैशाली सूर्यवंशी यांची उमेदवारी दाखल

खोक्यांच्या माध्यमातून आलेल्या मिंधे सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केले. गेल्या दोन वर्षात राज्यात एकही रोजगार आला नाही उलट इथला रोजगार मिंध्यांनी गुजरातला पाठवला. रोजगार गुजरातला अन् मिंधे गारेगार हे आता महाराष्ट्राला परवडणार नाही, असा जोरदार घणाघात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र आता सत्ता परिवर्तनासाठी सज्ज झाला असल्याचेही ते म्हणाले.

पाचोरा येथे आज महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने आयोजित जाहीर सभेत बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांची पिसे काढली. विकासाच्या नावावर महाराष्ट्र लुटण्याचे काम सुरू आहे. दोन वर्षात एकही रोजगार हे सरकार देऊ शकले नाही. एकही नवा उद्योग राज्यात आला नाही. उलट महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग मिंध्यांनी गुजरातच्या झोळीत टावूâन इथल्या बेरोजगारांची घोर फसवणूक केली. मिंधे सरकार आल्यापासून किती जणांच्या हाताला काम मिळाले असा सवाल आदित्य ठाकरे यांनी करताच संपूर्ण सभेने एकमुखाने कुणालाही नाही असे उत्तर दिले. आमचे सरकार आल्यास राज्यात प्रत्येक जिल्ह्यात तीन महिन्यांनी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतील असा शब्द त्यांनी दिला.

या जाहीर सभेला चाळीसगावचे महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेष पाटील, जयश्री महाजन, संपर्क प्रमुख संजय सावंत, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, एकलव्य सेनेचे सुधाकर वाघ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सुरक्षित बहिण योजना आणू भाजपने सत्तेत येताना प्रत्येकाला 15 लाख रुपये देणार असे आश्वासन दिले होते. आता लाडक्या बहिणींना पैसे देताना किती शुन्य काढले? 15 लाख देणार होते, देताहेत 1500 रुपये! आम्ही सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम तर देऊच पण सुरक्षित बहिण योजना देखील आणू अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली. आर. ओ. पाटील यांच्या आठवणींना उजाळा आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी पाचोऱ्यायाचे आमदार स्व. आर. ओ. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. आरओ तात्या म्हणजे शिवसेनेतील रसरसते चैतन्य होते. त्यामुळेच मी वैशालीताईंचा अर्ज भरण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.