दिल्लीत इतके प्रदूषण वाढले आहे की, मी सकाळी बाहेर चालायला जाणे बंद केले, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना सरन्यायाधीशांनी ही प्रतिक्रिया दिली. श्वसनाचे आजार जडू नयेत यासाठी ही काळजी घेत असल्याचे ते म्हणाले. पहाटे चार ते सव्वाचारच्या दरम्यान मी बाहेर चालण्याच्या व्यायामासाठी जातो. परंतु दिल्लीत प्रदूषणाचा स्तर इतका वाढला आहे की, मी आजपासून चालणे बंद करून टाकले, असे सरन्यायाधीश म्हणाले. पत्रकारांना सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात त्यांची वाहने पार्क करता येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन प्रक्रियेतील सर्व रेकॉर्ड ठेवण्यासाठी डिजिटलायझेशन महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयात रिपार्ंटगसाठी कायद्याची पदवी अनिर्वाय नाही
सर्वोच्च न्यायालयात रिपार्ंटग करण्यासाठी आता कायद्याची पदवी अनिवार्य नसेल. आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाचा पत्रकार म्हणून मान्यता मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक अटींमधील कायद्याच्या पदवीची अट काढून टाकली.