Maharashtra Assembly Election 2024 – आचारसंहिता भंगाच्या सर्वाधिक तक्रारी ठाण्यात

विधानसभा निवडणूक आचारसंहिता भंगाच्या 1011 तक्रारी आठवडाभरात नोंद झाल्या असून त्यातील सर्वाधिक 217 तक्रारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहत असलेल्या ठाण्यामधून आलेल्या आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यात 211 तर मुंबई उपनगरात 127 तक्रारींची नोंद झाली.

आचारसंहिता भंगाच्या 1011 तक्रारींपैकी 955 तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत. अन्य तक्रारींची चौकशी सुरू आहे.

44 कोटींची मालमत्ता जप्त

राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू अशी एकूण 44 कोटी 80 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.