Maharashtra Assembly Election 2024 – आदित्य ठाकरे आज वाजतगाजत भरणार उमेदवारी अर्ज

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख – आमदार आदित्य ठाकरे उद्या, गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून वाजतगाजत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

आदित्य ठाकरे उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोअर परळ पश्चिम येथील शिवालय सभागृहासमोरील शिवसेना शाखा क्रमांक 198 येथून आदित्य ठाकरे मिरवणुकीने वरळी इंजिनीयरिंग हब बीएमसी कार्यालयाकडे रवाना होतील. यावेळी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी तसेच शिवसैनिक, युवासैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आदित्य ठाकरे यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा वरळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. आता दुसऱयांदा ते वरळीतून रिंगणात उतरले आहेत.

स्थळ – इंजिनीयरिंग हब, वरळी नाका
वेळ – सकाळी 10 वाजता