ठाण्यातील ट्रॅफिकवर शेवंता भडकली

ठाण्यात ऐन सकाळी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ मधील शेवंता उर्फ अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने संताप व्यक्त केला. इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवत तिने ट्रॅफिकचा एक फोटो ठेवला आहे. यात अपूर्वाने म्हटलं की, हवं तर टोल घ्या… पण लेन सुरू करा. सकाळी 7 च्या वेळी असा ट्रॅफिक जॅम भयंकर. एक त्रस्त ठाणेकर. शेवंताने इन्स्टाग्राम स्टोरीवर वाहतूककोंडीचा फोटो शेअर केला आहे.