तुर्कीची राजधानी अंकारा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अनेक जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. तुर्कस्तानच्या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी TUSAS च्या परिसरावर हा हल्ला करण्यात आल्याचे तुर्कस्तानच्या एका मंत्र्याने सांगितले.
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्यात तीन जण ठार झाले असून पाच जण जखमी झाल्याचे स्थानिक महापौरांनी सांगितले. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हल्लेखोर गोळीबार करताना दिसत आहेत.
असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोरांपैकी एकाने बॉम्बचा स्फोट करत गोळीबार केला. हल्लेखोरांमध्ये एका पुरुषाचा आणि एका महिलेचा समावेश आहे. हल्लेखोरांकडे ॲसॉल्ट रायफल होते. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.