JPC च्या बैठकीत BJP आणि TMC नेत्यांमध्ये वाद, तृणमूलचे कल्याण बॅनर्जी जखमी

वक्फ सुधारणा विधेयकावरून जेपीसीच्या बैठकीत पुन्हा वादाची ठिणगी उडाली आहे. तृणमूल काँग्रेसचे कल्याण बनर्जी आणि भाजपचे अभिजीत गंगोपाध्याय यांच्यात गदारोळ झाला. जेपीसीच्या बैठकीत दोन्ही नेते आक्रमक झाले. यावेळी बाचाबाची आणि हाणामारीत कल्याण बॅनर्जी यांच्या टेबलावर ठेवलेली काचेची बाटली खाली पडली. यादरम्यान कल्याण बॅनर्जी यांच्या हातालाही दुखापत झाली आहे.

वक्फ सुधारणा विधेयकावर मंगळवारी जेपीसीची बैठक झाली. त्यावेळी जस्टिस इन रिॲलिटी, कटक, ओडिशा आणि पंचसखा प्रचार बनी मंडळी, कटक, ओडिशा यांचे सादरीकरण सुरू होते. यावेळी कल्याण बनर्जी यांना कोणाचीही परवानगी न घेता वेळेआधीच बोलत होते. प्रेझेंटेशन दरम्यान त्यांना आणखी एक संधी हवी होती. त्यावर भाजप खासदार अभिजीत गंगोपाध्याय यांनी आक्षेप घेतला.

दरम्यान, कल्याण बनर्जी आणि अभिजीत गंगोपाध्याय यांच्यात बाचाबाची झाली. तेवढ्यात कल्याण बॅनर्जी यांनी तिथे ठेवलेली काचेची पाण्याची बाटली उचलून टेबलावर आपटली. यामुळे ती बाटली फुटली आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. या घटनेमुळे बैठक काही काळासाठी थांबवावी लागली.