Flight Bomb Threat: एअर इंडियासह 30 विमानांना मिळाली बॉम्बने उडविण्याची पुन्हा धमकी

गेल्या काही दिवसांपासून विमानांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्याचे सत्र सुरुच आहे. सोमवारी पुन्हा एकदा एअर इंडियासह 30 विमानांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याआधी रविवारी 36 विमानांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली होती. या धमक्यांमुळे गेल्या आठवड्याभरात 100 विमानांना त्याचा फटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बने उडविण्याची धमकी मिळालेल्या विमानांमध्ये इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या विमानांचा समावेश आहे. याप्रकरणी इंडिगोच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी सांगितले की, सोमवारी त्यांची चार विमाने मंगळुरुहून मुंबईला जाणारी 6E 164, अहमदाबाद येथून जेद्दाला जाणारी 6E 75, हैदराबादहून जेद्दाला जाणारी 6E 67 आणि लखनऊहून पुण्याला जाणारी 6E 118 या विमानांना सुरक्षेसंदर्भात अॅलर्ट मिळाले होते.

विशेष म्हणजे आधी बॉम्बची 100 विमांनाना धमकी मिळाली होती. रविवारी 36 विमानांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली होती. यामध्ये इंडिगो, विस्तारा, अकासा एअर, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि डेल्टाच्या विमानांचा सहभाग आहे.,