50 हजारांची मागितली खंडणी

बोरिवली येथे बांधकामाधीन इमारतीचे काम सुरू ठेवण्यासाठी 50 हजारांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंद करून एकाला ताब्यात घेतले आहे. तक्रारदार हे खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीची बोरिवलीच्या चिकूवाडी येथे साईट सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी बांधकामाच्या ठिकाणी तीन जण आले. त्यांनी कामगारांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा एकाने काम करायचे असल्यास 50 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.