अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. पणत्या, रांगोळ्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्यासाठी रविवारी दादर मार्केटमध्ये मुंबईकरांनी एकच गर्दी केली. खरेदी करण्यासाठी दादर मार्केटमध्ये गर्दी झाली. सर्वच वस्तूंच्या किमती भरमसाट वाढल्याने दिवाळीच्या सणावर महागाईचे सावट असले तरी प्रत्येकजण खिसा थोडा सैल सोडत खरेदीला प्राधान्य देत होता. दिवाळीत संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून जातो. आकर्षक दिवे, लायटिंग खरेदी स्वस्तात खरेदी करण्यासाठी दादर मार्केटमध्ये गर्दी होत आहे. सध्याच्या ऑनलाईनच्या युगात घरबसल्या हवी ती वस्तू ऑर्डर करता येत असली तरी कपडे खरेदी करण्यासाठी खासकरून महिलावर्गाचा कल आजही स्ट्रीट शॉपिंगकडे असल्याचे पाहायला मिळाले आहे.