दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मात्र, रविवारी सकाळी रोहिणी सेक्टर 14 येथील प्रशांत विहार परिसरात सीआरपीएफ शाळेजवळ स्फोटाने दिल्ली हादरली. या स्फोटानंतर रहिवासी दहशतीखाली असून, स्पह्टाचे कारण अद्याप समोर आले नाही. सुदैवाने या स्पह्टात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, स्पह्टात सीआरपीएफ शाळेची भिंत, जवळची दुकाने आणि उभ्या कारसह अनेक वाहनांचे नुकसान झाले.
स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्फोटानंतरचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला असून, यामध्ये सर्वत्र धूर झाल्याचे दिसत आहे. पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक, फॉरेन्सिक टीम, गुन्हे शाखा आणि विशेष कक्ष तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी तपासासाठी मदतकार्य करत आहेत. ऐन दिवाळी सणाच्या काळात दिल्लीत झालेल्या या स्फोटाबाबत सुरक्षा यंत्रणांनी चिंता व्यक्त केली आहे. प्राथमिक तपास अहवालात स्फोटात वापरलेली सामग्री क्रूड बॉम्बसारखी आहे, मात्र संपूर्ण अहवाल आल्यानंतरच अधिकृत माहिती समोर येईल.
स्फोटाची सखोल चौकशी होणार
राजधानी दिल्लीत सुरक्षा यंत्रणा सतर्क असताना अचानक झालेल्या स्पह्टाने दिल्लीकरांच्या मनात भीती निर्माण झाली. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याच्या कोनातूनही तपास होणार असून, स्पह्टाची सखोल चौकशी होणार आहे. पोलिसांनी सतर्कता आणि तपास वाढवण्यासाठी अनेक यंत्रणा कामाला लागल्या. दिल्लीतील बाजारपेठांमध्ये पायी गस्तही वाढवली आहे. लोकांनी कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.