विमा कर्मचारी सेनेचे नॅशनल इन्शुरन्स कार्यालयात धरणे आंदोलन, दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली वेतनवाढ व अन्य मागण्यांचा प्रशासनाला विचारला जाब 

गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतन वाढीचा करार, एम पी एस व अन्य मागण्यासाठी विमा कर्मचारी सेनेच्या नेतृत्वाखाली नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच धरणे आंदोलन केले. कंपनीच्या चेअरमन व सहाय्यक व्यवस्थापकांना निवेदन देतानाच यावर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नॅशनल इन्शुरन्स विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस संजय डफळ यांनी दिला.

नॅशनल इन्शुरन्सच्या कर्मचाऱ्यांची पगार वाढ गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. एम पी एस व अन्य मागण्यासाठी भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाचे सरचिटणीस व खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली विमा कर्मचारी सेनेचा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनाला जाग आणण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातच विमा कर्मचारी सेनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

आंदोलन यशस्वी करण्यात नॅशनल इन्शुरन्स युनिटचे अध्यक्ष सुरेश कुमार, मुंबई युनिटचे अध्यक्ष महेश कदम, कार्यकारी चिटणीस आनंद कांबळी, कार्याध्यक्ष जगन्नाथ ब्रीद, मिलिंद सारंग,वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत सावंत, प्रकाश रणदिवे,महिला आघाडी प्रमुख व उपाध्यक्ष नीलिमा राज्याध्यक्ष, श्रुती भिवडे, उपाध्यक्ष अर्चना विचारे,अनिता नागोठणेकर, खजिनदार निषाद म्हात्रे, उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, प्रशांत मांजरेकर,देवेंद्र पवार, मिलिंद आंब्रे, वसंत दलाल,हरून शेख, आशिष दुरगुडे, किरण बद्रीचा, रुपेश कोळी, निरज मिराशी, प्रदीप लाड,दिनेश मकवाना, सोपान कणगरे, सागर घुगे, संजय कुबल, शुभांगी शिसोदे,सायली तारवारे, रोहित रसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

कंपनीच्या चेअरमनना निवेदन

भारतीय विमा कर्मचारी सेना न्यू इंडिया इन्शुरन्सचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, ओरिएंटल इन्शुरन्स चे सरचिटणीस संजय शिर्पे, भारतीय विमा कर्मचारी सेना नॅशनल इन्शुरन्स युनिटचे सरचिटणीस संजय डफळ, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सरचिटणीस अजय दळवी, अवधूत कुलकर्णी, सचिन खानविलकर, अशोक रेडीज, जीआयसीचे सरचिटणीस अंकुश कदम यांनी मार्गदर्शनपर भाषण करतानाच विमा कर्मचाऱ्यांच्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतन वाढीचा करार एमपीएस व अन्य मागण्यांचा जाब आस्थापनाला विचारला. तसेच नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या चेअरमन व कार्यकारी संचालक राजेश्वरी मुनी व मुंबई क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महाव्यवस्थापक यांना निवेदनही देण्यात आले.