दापोली खेर्डी जाडेवाडीत शिंदे गटाला धक्का; अनेक कार्यकर्त्यांची संजय कदमांना साथ, शिवसेनेत केला प्रवेश

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक पक्षप्रवेशांचा धडाका सुरू आहे. दापोलीत शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील अनेकांचे पक्षप्रवेश धडाक्यात केले आहेत. दापोली तालुक्यासह मंडणगड आणि खेड तालुक्यातील गावेच्या गावे आणि वाडया वस्तींचे पाडे संजय कदम यांच्यासोबत आले आहेत. दापोली तालुक्यातील खेर्डी पानवाडीच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर आठवड्याभरातच खेर्डी जाडेवाडीने शिंदे गटातून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करत खेर्डीत पर्यायाने दापोलीत शिवसेनेचे पक्ष संघटन अधिक मजबूत स्थितीत उभे केले आहे.

दापोली तालुक्यातील खेर्डी जाडेवाडी येथील सुरेश विठ्ठल जाडे, प्रणय प्रकाश कोळंबेकर, शांताराम भागोजी जाडे, बाळकृष्ण गणपत जाडे, दामोदर सोनु जाडे, संदीप गोविंद कानसरे, संदेश गोविंद कानसरे, रमेश रामजी जाडे, विकास गोविंद जाडे, मधुकर गुणाजी जाडे, मधुकर शिवराम शिंदे, आयुष्य अविनाश शिंदे, निहार राजेंद्र पवार,महेंद्र रामचंद्र धाडस, अक्षय अशोक जाडे, साईराज प्रकाश जाडे आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह संपूर्ण खेर्डी जाडे वाडीने आपल्या ग्रामस्थांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात प्रवेश केला. शाखा प्रमुख रामचंद्र जाडे आणि खेर्डी युवा मंचचे अध्यक्ष व खेर्डी शाखेचे सल्लागार शैलेश कदम यांच्या प्रयत्नाने जिल्हाप्रमुख संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षामध्ये वरील सर्वांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.

शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्याला खेड पंचायत समितीचे माजी सभापती आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उप जिल्हाप्रमुख विजय जाधव, दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर , दापोली पंचायत समितीचे माजी सभापती चद्रकांत बैकर,माजी उप सभापती दिपक खळे, वर्षा शिर्के, विजय साबळे,आंजर्ले विभाग प्रमुख तृषांत भाटकर, उसगाव विभाग प्रमुख रमेश बहीरमकर, विजय बाक्कर, स्वप्निल पाटील आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.