असे अनेक शाकाहारी पदार्थ आहेत जे सहसा आपण संकोच न बाळगता खातो ज्यामध्ये मांसाहारी गोष्टींचा समावेश असू शकतो. आजकालच्या बदलत्या जिवनशैलीमध्ये अनेक जण जंकफूडच्या आहारी गेले आहेत. मात्र या ज्या शाकाहारी मानल्या जाणाऱ्या पदार्थ मांसांहारी असू शकतात. असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे शाकाहारी दिसून येतात मात्र त्यामध्ये काही प्रमाणात मांसाहारी गोष्टी मिसळलेल्या असतात.
अशाच काहि गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या बहुतेक लोक शाकाहारी समजून खातात, पण प्रत्यक्षात त्या मांसाहारी असतात.
बिअर/वाईन
काही बिअर आणि वाईन फिश फंगसपासून बनवलेल्या असतात, ज्या इसिंगलासद्वारे फिल्टर केल्या जातात. म्हणून, बिअर किंवा वाइन खरेदी करण्यापूर्वी, लेबल काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
जेली
काही ठिकाणी प्राण्यांच्या हाडांमधून काढलेले जिलेटिन जेली बनवण्यासाठी वापरले जाण्याची शक्यता असते.
डोनट्स
काहि डोनट्समध्ये एल-सिस्टीन नावाचे एमिनो ॲसिड असते, जे बदकाच्या पंखांमधून काढले जाते.
सॅलड ड्रेसिंग
अनेक सॅलड ड्रेसिंगमध्ये अंडी आणि मासे असतात (जसे की अँकोव्हीज). जेव्हा तुम्ही सॅलड ड्रेसिंग खरेदी करता तेव्हा लेबल काळजीपूर्वक वाचा.
सूप
काहि शाकाहारी सूपमध्ये फिश सॉस चा वापर केला जातो.
रेड कँडीज
अनेक रेड कँडी कार्माइन डाईपासून बनवल्या जातात, जे कोचीनियल कीटकांपासून काढले जातात. कँडीज खरेदी करताना, ते वनस्पतीच्या रंगांनी बनवले आहेत का ते पडताळून पाहा.
पॅकेटमधील संत्र्याचा रस
काही पॅकेज केलेल्या संत्र्याच्या रसांमध्ये माशांच्या तेलातून काढलेले ओमेगा -3 फॅटी ऍसिड असते.