वाशिष्ठी नदी ‘गाळ’ फुल्ल; कोटय़वधींचा खर्च पाण्यात

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी शासनाने कोटय़वधी रुपये खर्च केले; मात्र पावसाळ्यानंतर वाशिष्ठी नदीचे पात्र पुन्हा गाळाने भरले आहे. त्यामुळे गाळ काढण्यासाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पूरमुक्तीसाठी गाळ काढणे हा एकमेव उपाय आहे का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

नदीत अजून अनेक ठिकाणी गाळाची बेटे आहेत. ती काढण्याचे काम शिल्लक असताना या वर्षी झालेल्या पावसानंतर नदीपात्रात पुन्हा नव्याने गाळ साचला आहे. गाळ काढण्यासाठी शासनाने तीन टप्पे तयार केले आहे. त्यातील दोन टप्पे चिपळूण शहराच्या आजूबाजूचा परिसर आणि तिसरा टप्पा ग्रामीण भागाचा आहे.

गाळ काढण्याला प्राधान्य

चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी तत्कालीन सरकारने मोडक समिती तयार केली होती. या समितीने सह्याद्रीच्या खोऱयातील वृक्षतोडीवर बंदी घालावी. तसेच वाशिष्ठी नदीवर छोटे बंधारे बांधण्यात यावेत अशी शिफारस केली होती.

नियोजन गरजेचे

चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी वाशिष्ठाr नदीमध्ये गाळ येणारच नाही, यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. डोंगराळ भागात नुसत्या चरी मारून उपयोग नाही. त्यासाठी नियोजनपूर्वक काम करण्याची खरी गरज आहे. प्रत्येक भागात वेगळ्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

-शाहनवाज शाह, जलदूत चिपळूण